पोर्टलॅन्ड
पोर्टलॅन्ड : अमेरिकेच्या ऑरेगन राज्यातील प्रमुख शहर. मल्टनोमा परगण्याचे मुख्य ठिकाण व प्रवेश बंदर. लोकसंख्या ३,८२,००० (१९७६ अंदाज);उपनगरांसह ८,२४,९२६ (१९७०). हे कोलंबिया नदिखोऱ्यात कोलंबिया व विलेमिट नदीसंगमापासून ३० किमी., पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यापासून १८२ किमी. विलेमिट नदीकाठी वसले आहे.